मुख्यमंत्री म्हणाले, त्यांनाच काय ते विचारा…

बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (07:53 IST)
पुणे: राज्य सरकार अतिशय चांगले काम करीत असून, अनेक चांगले निर्णय आम्ही घेतले आहेत. लवकरच मंत्रिमंडळ विस्तार ही होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्र्यांनी आज पाच जिल्ह्यांतील पूरस्थितीची आढावा बैठक घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी संजय राऊत यांच्या ईडी कारवाईवरही त्यांनी भाष्य केले.
 
यावेळी शिंदे म्हणाले,आता मंत्रिमंडळ विस्तारही होईल. पाचही जिल्ह्यातील अतिवृष्टी, पिकस्थितीचा आज आढावा घेतला. ज्या जिल्ह्यातील कामे रखडली आहेत, त्या कामांना गती मिळावी, याकरिता ही बैठक घेतली. लोकांची कामे झाली पाहिजेत व ती दर्जेदार व्हावीत त्या दृष्टीने सकारात्मक विचार करू असे ही ते म्हणाले.
 
संजय राऊत यांच्या घरात ईडीला सापडलेल्या रोख रकमेपैकी बंडलवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव लिहिल्याचं आढळून आलं होतं. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, पैसे कुणाच्या घरी मिळाले? माझ्या नाहीत. ज्यांच्या घरी मिळाले, त्यांनाच काय ते विचारा, असे उत्तर देत स्पष्टीकरण दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती