लम्पी चर्मरोगा बाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

सोमवार, 12 सप्टेंबर 2022 (23:20 IST)
लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये वाढत आहे. या रोगामुळे जनावर दगावत आहे. त्यामुळे प्राण्यांच्या पालकांना मोठे नुकसान होत आहे. आज मुख्यमंत्रीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत लम्पी चर्मरोगा मुळे दगावलेल्या  प्राण्यांच्या पालकांच्या होणाऱ्या नुकसानाला भरून काढण्यासाठी एक निर्णय घेण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसान भरपाई जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश दिले. तसेच पशुसंवर्धन विभागातील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची 286 पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील 873 अशी एकूण1,159 रिक्तपदे भरण्याबाबत देखील मान्यता देण्यात आली. हे रिक्तपदे बाह्यस्त्रोताद्वारे भरले जातील. 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्या शेतकऱ्यांचे किंवा पशुपालकांचे पशु या आजारामुळे बळी गेले आहेत त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धरणामधील निकषानुसार राज्य शासनाच्या निधीतून पशुधन नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला. तसेच या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक लस, औषध, साहित्यसाठी लागणारी निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती