डॉक्टरांनी विषबाधा होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
डॉक्टर म्हणाले की शिळी बिर्याणी खाल्ल्यामुळे पोटात इन्फेक्शन झाले असावे. त्यामुळे लिव्हरवर परिणाम होऊन इन्फेक्शन मुळे रक्त पातळ होऊन अंतर्गत रक्तस्त्राव झाला. आणि त्यामुळे विषबाधा होऊन त्याचा मृत्यू झाला.
बऱ्याचदा काही हॉटेल वाले चिकन बिर्याणीत शिळे आणि खराब झालेले मांस वापरतात आणि बिर्याणी स्वस्तात विकतात. त्यामुळे हे अन्न देखील विषारी होत. पण पैशांसाठी हे लोकांच्या जीवाशी खेळतात. हे सचिन सोबत घडले. सचिन ने कुठून ही विषारी बिर्याणी आणली होती हे कोणालाच माहित नसल्यामुळे बिर्याणीवाल्याचा शोध कसा लावावा हे कोडंच आहे. पोलिसांनी त्या बिर्याणीवाल्याच्या शोध घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल कारवाई करावी असे सचिनच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.