छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधील चिंचाळा परिसरात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे जिल्हा सत्र न्यायालयातील एका निवृत्त लिपिकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह शिरविच्छेद करून विहिरीत टाकण्यात आला. काही वेळाने त्यांचा मृतदेह विहिरीच्या पाण्यात तरंगू लागला. या घटनेमुळे परिसरात घबराहट पसरली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. नामदेव एकनाथ ब्रह्मराक्षस असे या मृत व्यक्तीचे नाव असून ते गेवराई न्यायालयात लिपिक म्हणून काम करायचे. ते नुकतेच सेवा निवृत्त झाले होते.पैठण शिवारात त्यांची शेतजमीन होती. ते त्यांच्या पत्नीसह मंगळवारी छत्रपती संभाजीनगरहुन त्यांच्या भावाच्या गावी शेतावर घर बांधण्याच्या उद्देश्याने आले होते.
शुक्रवारी पहाटे 3 वाजे पासून बेपत्ता होते. सकाळी त्यांना कुटुंबीयांनी खूप शोधले. शोधताना त्यांच्या शिरविच्छेद मृतदेह विहिरीत आढळला. गावकऱ्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यांच्या मृत्यूची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली.त्यांचा मृत्यू कसा झाला आणि त्यांची हत्या कोणी केली हे अद्याप समजू शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहे.