छगन भुजबळ अडचणीत, अंजली दमानियां पुन्हा कोर्टात

गुरूवार, 13 जानेवारी 2022 (15:35 IST)
सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कुटूंबाला वेगवेगळ्या कंत्रांटांच्या माध्यमातून आर्थिक फायदे करुन दिले. छगन भुजबळ यांच्या कुटूंबाला आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर होता. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख यांचा समावेश होता.
 
छगन भुजबळांसह कुटुंबियांच्या निर्दोष मुक्ततेला समाजसेविका अंजली दमानिया यांनी हायकोर्टात आव्हान दिल़ आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयाच्या निकाला विरोधात अंजली दमानिया यांनी याचिका दाखल केली आहे.
 
भुजबळांची या प्रकरणी राज्य लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात आली होती. भुजबळांना एसीबीने क्लिन चीट दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी) न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही हा अर्ज दाखल केला होता.
 
आपल्यावर करण्यात आलले आरोप हे निराधार आहेत. त्यामुळे न्यायालयाने आपल्याला दोषमुक्त करावे असे भुजबळ यांनी म्हटले होते. त्यानंतर न्यायालयाने भुजबळांची निर्दोष मुक्तता केली होती. याच निर्णया विरोधात दमानिया यांनी मुंबई हायकोर्टात पुन्हा धाव घेतल आहे. याआधीच एसीबीने याच महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातील पाच आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती