गेली 10 वर्ष पुरातत्व विभागाच्या सूचनांचं पालन होत नसल्याने मूर्तीची झीज वाढली आहे. विठूरायाची स्वयंभू मूर्ती वालुकाशम दगडाची असून गेल्या अनेक वर्षांपासून मूर्तीवर महापूजांमुळे रासायनिक क्रियेमुळे झीज होते. 2010 सालापासून महापूजा बंद करण्यात आल्या होत्या. याशिवाय दोन वेळा मूर्तीवर वज्रलेपाची प्रक्रिया झाली असून आता पाच वर्षानंतर वज्रलेपन प्रक्रिया पुन्हा करावी लागणार आहे.