विधानपरिषदेतून राणेंची माघार!

मुंबई- माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधानपरिषदेतील आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या एका जागेसाठी येत्या 7 डिसेंबरला निवडणूक होत आहे.

सत्ताधारी भाजपकडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या नावाची चर्चा होती मात्र, त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता भाजपकडून उमेदवार कोण यावर खल सुरु आहे. प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि पक्षाच्या कोषाध्यक्षा, प्रवक्त्या शायना एनसी यांची नावे समोर येत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती