बाप्परे ५० जणीना लग्नाचे आमिष दाखवून फसविले

शनिवार, 7 डिसेंबर 2019 (10:40 IST)
शादी डॉट कॉम, जीवन साथी डॉट कॉम या ऑनलाईन पोर्टलवर बनावट प्रोफाइल बनून जवळपास ५०पेक्षा जास्त घटस्फोटीत महिलांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. संपत दरवडे तथा मनोज पाटील आणि मयूर पाटील अशा नावाने त्याने प्रोफाइल तयार केली होती. संपत दरवडे हा शादी डॉट कॉम जीवन साथी डॉट कॉम सारख्या विवाह नोंदणी संकेतस्थळवर आपले खोटे प्रोफाइल तयार करत होता.
 
ज्या महिला घटस्फोटीत आहेत आणि ज्यांना मूल-बाळ आहे, अशा महिलांना लग्नाकरिता मागणी करत होता. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा विश्वास संपादित करत असे. थोड्याच दिवस लग्न करू, असे आश्वासन देत जवळीक वाढत असे. एकदा का सलोखा वाढल्यानंतर   पैसे आणि सोने याची मागणी करून पोबारा करायचा.
 
दरम्यान, लग्नाची मागणी करुनही पैसे आणि सोने घेऊन तो पुन्हा येत नसे. याबाबत काही महिलांना संशय आला. काही महिलांनी पोलिसात तक्रारी केल्या. नाशिकमध्ये  अशाच एका महिलेला फसवणार असल्याची माहिती छत्रपती सेनेला मिळाली असता, क्राइम ब्रँचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मदतीने या युवकाला बेड्या ठोकण्यात आल्या. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती