चंद्रकांत पाटील यांना फोनवरून आत्महत्या करण्याची धमकी

शुक्रवार, 10 मे 2019 (16:13 IST)
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणासंदर्भातली राज्य सरकारची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली असल्याने विद्यार्थ्यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. डॉ. तात्याराव लहाने, मराठा मोर्चाचे नेते आणि विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना फोनवरून आत्महत्या करण्याची धमकी दिली.
 
याआधी सोलापुरात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची मराठा विद्यार्थ्यांसोबत भेट झाली. यावेळी त्यांनी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना न्याय देणार असं आश्वासन दिलं. २०० पैकी १०० विद्यार्थ्यांना मेरिटनुसार ओपनमधून प्रवेश मिळेल, उर्वरित १०० विद्यार्थ्यांसाठी कोटा वाढवून मिळावा यासाठी देवेंद्र फडणवीस केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहेत अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती