शरद पवारांवर टीका करताना चंद्रकांत पाटलांची जीभ घसरली; एकेरी भाषेत टीका करत म्हणाले…

शुक्रवार, 15 ऑक्टोबर 2021 (23:41 IST)
भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे आज (शुक्रवारी) सांगली (Sangli) दौ-यावर आले होते. येथे भाजपा पदाधिकारी बैठकीदरम्यान बोलताना पाटील यांची जीभ घसल्याचं पाहायला मिळालं. आपल्या भाषणात चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचा एकेरी उल्लेख केला असल्याचं समोर आलं आहे.
सांगलीत भाजपा पदाधिकारी बैठकीदरम्यान चंद्रकांत पाटील हे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते.
त्यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘राज्यात शरद पवारचं आपल्याला आव्हान नाही, कारण 54 आमदाराच्या वर त्याला आम्ही जाऊ दिलं नाही.
सगळं आयुष्य गेलं पण कधी 60 वर तो गेला नाही’, अस भाष्य करत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर एकेरी भाषेत टीकास्त्र सोडलं आहे.
 
दरम्यान, पुढे बोलताना पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस  यांच्या नेतृत्वाने राज्यातील राजकारणाला मोठी कलाटणी मिळाली.सांगलीतील नेत्याला वाटत होतं की आमच्या शिवाय पर्याय नाही. पण भाजपा कार्यकर्त्यांनी इथं यश मिळवून दाखवलं होतं.मी काय त्या नेत्यांचं नाव घेणार नाही, माझ्यावर केसेस सुरू आहेत, मी फकीर आहे, मी काय घाबरत नाही, असं ते म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती