पुढील चार दिवसात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

मंगळवार, 5 ऑक्टोबर 2021 (08:26 IST)
पुढील चार ते पाच दिवसांमध्‍ये राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागान वर्तवली आहे. हवामान विभागाने ७ ऑक्टोबरपर्यत पावसाची शक्यता वर्तवली आहे.कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, उस्मानाबाद, बीड. औरंगाबाद, अहमदनगर, जालना, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गडचिरोली, गोंदिया.
 
कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, बीड, औरंगाबाद, नाशिक, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिक, अकोला, वर्धा, नागपूर.पुढील चार ते पाच दिवसांमध्‍ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्यावेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका हाेवू शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपारनंतर ‌संध्याकाळी व रात्रीपर्यंत असते, अशी माहिती हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विटर वरुन दिली आहे.
 
परतीच्या पावसाने मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे नूकसाने झाले आहे. हाताशी आलेली पीकं वाहून गेली आहेत. सोयाबीन, कापूस अशी पीकं वाहून गेली आहेत.आता पुढचे चार दिवस मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. पुढचे चारही दिवस मराठवाड्यातील जिल्ह्यांवर येलो अलर्ट आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती