Monsoon Alert : पुढील 4-5 तासांत मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ जिल्ह्यांना इशारा

सोमवार, 27 जून 2022 (17:31 IST)
मुंबई : एक महत्त्वाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे की  येत्या तीन ते चार तासांत रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दुपारी 2.45 वाजता उपग्रहाच्या निरीक्षणातून हे सूचित करण्यात आल्याचे विभागाने म्हटले आहे. हवामान खात्याचे के.एस. होसाळीकर यांनी याबाबद ट्विट केले आहे.
 
हवामान खात्याने पुढे सांगितले की, रायगड जिल्ह्यालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबई ठाण्यात अंशत: ढगाळ वातावरण आहे. घाट परिसरातही काही मुसळधार पावसासाठी अनुकूल स्थिती असल्याचे विभागाने सांगितले.

दरम्यान, दक्षिण कोकणात मुसळधार तर उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती