पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता, ११ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी

मंगळवार, 26 जुलै 2022 (21:06 IST)
राज्यभरात पुढील ३ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय, आज राज्यातील १८ जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यानुसार, पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या ११  जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
 
येत्या काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी याबाबतचं ट्वीट केलं आहे. दरम्यान, बुधवार २७ जुलै रोजी कमी-अधिक प्रमाणात राज्यात पावसाची हीच स्थिती कायम राहणार आहे.
 
गुरुवारनंतर राज्यात पावसाचा जोर पुन्हा कमी होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, गुरुवारी पुण्यासह, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, अहमदनगर, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड या ११ जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती