मनसेचे मराठी प्रेम : मराठी भाषा दिन धूमधडाक्यात साजरा करा, मनसे प्रमुखांचे आदेश

सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (08:31 IST)
मनसे प्रक़्मुख राज ठकरे हे मराठी मुद्द्यावर कायम आहेत हे नेहमीच समोर येतेय, आताही मनसेने मराठी मुदा परत धरला आहे, आगामी मराठी भाषा दिन धूमधडाक्यात साजरा करावा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. आपली भाषा आहे, म्हणून आपण आहोत आणि आपली ओळख आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
कविवर्य कुसुमाग्रज यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कार्यकर्त्यांना पत्र लिहून ठाकरे यांनी मराठी भाषा दिन धूमधडाक्यात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.  ज्या भाषेने कित्येक मोठे साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक दिले, त्या भाषेचा हा गौरव  दिवस आहे. संत ज्ञानेश्वरांपासून, संत तुकाराम, चोखामेळा, गोरोबा कुंभार अशी संत मंडळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ह्यांच्यासारखी द्रष्टी माणसे, स्वातंत्र्यवीर सावरकर, हुतात्मा राजगुरूंसारखे क्रांतिकारक, शाहीर अमर शेख, शाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांच्यासारखे समाजाला जागे ठेवणारे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, गाडगे महाराज, लोकमान्य टिळक, कर्मवीर भाऊराव पाटील, अशी किती किती नावे घ्यायची? या सर्वाची भाषा आणि  छत्रपती शिवाजी महाराज यांचीही भाषा मराठीच होती. अशा या मराठी भाषेचा जयजयकार त्याच जोमाने व्हायला हवा अशी सूचना त्यांनी पत्राद्वारे केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती