मराठीला ‘अभिजात’ दर्जा मिळणार का? मागणीसाठी ४ हजार पोस्ट कार्ड राष्ट्रपतींकडे रवाना

सोमवार, 21 फेब्रुवारी 2022 (08:18 IST)
मराठी भाषेला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी असलेली ४ हजार पोस्ट कार्ड आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतींकडे रवाना करण्यात आली. याप्रसंगी वर्षा शासकीय निवासस्थानी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.
 
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वाखाली एक जन अभियान सुरू करण्यात आले आहे. हा ‘अभिजात’ दर्जा २७ फेब्रुवारी २०२२ रोजी मराठी भाषा दिवस आहे त्याआधी मिळावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून  मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते सुमारे ४ हजार पोस्ट कार्ड महामहीम राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांना पाठविण्यात आली. हा पोस्ट कार्डचा दुसरा संच आहे, याआधीसुद्धा एक संच राष्ट्रपती महोदयांना पाठविण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती