पेपरफुटी प्रकरणांची सीबीआय चौकशी करा - देवेंद्र फडणवीस

शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (10:09 IST)
राज्यात झालेल्या विविध परीक्षांच्या पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी, यासाठी न्यायालयात धाव घेणार असल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
म्हाडा, आरोग्य विभाग, टीईटी अशा अनेक परीक्षांचे पेपर फुटले आहेत. या सर्वाचे धागेदोरे हे थेट मंत्रालयापर्यंत पोहोचलेले असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
टीईटी परीक्षेतील गेरप्रकारात मंत्र्यांच्या नीकटवर्तीयांचा समावेश असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळं सरकारनं सीबीआय चौकशीची मागणी मान्य केली नाही, तर न्यायालयात जाणार असल्याचं फडणवीस म्हणाले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती