मिळालेल्या माहितीनुसार मृताच्या नावावर बनावट पीआर कार्ड बनवून फ्लॅट दुसऱ्याला हस्तांतरित केल्याबद्दल सिटी सर्वे ऑफिस संशयाच्या भोवऱ्यात आले आहे. ही घटना २८ ऑगस्ट रोजी उघडकीस आली. सूत्रांनी सांगितले की, या प्रकरणात आरोपी सिटी सर्वे ऑफिसर आणि महिला कर्मचारी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि दोघेही फरार आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस निरीक्षक यांनी सांगितले की, जामीन अर्जावर बुधवार, ३ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. पोलीस निरीक्षक येर्मे यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.