प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारं प्रदूषण आणि धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्या मूर्ती पाण्यात पूर्ण विसर्जित होत नाहीत. त्याचे अवशेष जसेच्या तसे राहतात. त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेऊन ही बंदी यावर्षीही कायम ठेवण्यात आली आहे.