दहावी, बारावीचा निकाल रखडण्याची शक्यता आहे. विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत राज्यातील हजारो शिक्षकांनी पेपर तपासण्यास बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकांचे गठ्ठे तपासणीविना पडून आहेत. या आंदोलनाचा परिणाम दहावी, बारावीच्या निकालावर होण्याची शक्यता असल्याने भविष्यात शिक्षण मंडळ संकटात सापडण्याची शक्यता आहे.