कित्येक दिवस मंत्रीमंडळात असताना त्या दोघांनी प्रकल्पाबाबत प्रयत्न करायला हवे होते : अजित पवार

शनिवार, 17 सप्टेंबर 2022 (15:48 IST)
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. कित्येक दिवस मंत्रीमंडळात असताना त्या दोघांनी प्रकल्पाबाबत प्रयत्न करायला हवे होते, असा टोला अजित पवारांनी लगावला आहे.
 
आता तीन महिने झाले यांना मुख्यमंत्री होऊन. कंपनीचं ते ट्वीट आल्यानंतर हे सगळं समजलं. आज ९० दिवस काही कमी नाहीयेत. स्वत: प्रयत्न करायचे नाहीत. कित्येक दिवस तर ते दोघंच मंत्रीमंडळात होते. त्यावेळी मोठ्या प्रकल्पांबाबत प्रयत्न करायला हवे होते, असं अजित पवार म्हणाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती