अमरावती कारागृहात स्फोट,पोलीस तपासात गुंतले

रविवार, 7 जुलै 2024 (12:39 IST)
महाराष्ट्रातील अमरावती मध्यवर्ती कारागृहात भीषण स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रत्यक्षात अमरावती मध्यवर्ती कारागृहात देशी बनावटीचा बॉम्ब फेकल्यानंतर मोठा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,बॅरेक क्रमांक 6 आणि 7 मध्ये हे स्फोट झाले. 

सदर घटना शनिवारी रात्री 8:30 च्या सुमारास घडली आहे. देशी बनावटी बॉम्बचा स्फोट झाला. स्फोट कोणी आणि का केला अद्याप कळू शकले नाही.या स्फोटात सुदैवाने कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नाही.या घटनेमुळे कारागृहात खळबळ उडाली.  
 
घटनेची माहिती मिळतातच अधिकारी आणि पोलीस आयुक्त घटनास्थळी पोहोचले. तसेच बॉम्ब शोध पथक आणि फॉरेन्सिक टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचले. प्राथमिक तपासात आढळले की, कोणीतरी प्लॅस्टिकच्या क्रिकेट बॉल मध्ये फटाके किंवा स्फोटक भरून तुरुंगाच्या मागील भिंतीवरून फेकली होती. 

बॉल फेकणाऱ्या व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहे. फॉरेन्सिक टीम देखील शोध घेत आहे. स्फोटात कोणत्या स्फोटकाचा वापर केला होता हे तपासणी नंतर कळेल.पोलीस प्रकरणाचा आणि स्फोट घडवून आणणाऱ्याचा शोध घेत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती