5 डिसेंबर रोजी आझाद मैदान येथे होणाऱ्या शपथविधीची भाजपकडून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या शपथविधीच्या सोहळ्याची तयारीला आढावा घेण्यात आला. या वेळी चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
31 व्या मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आझाद मैदान येथे 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. एनडीए शासित राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले. तसेच सर्व केंद्रीय मंत्री, राज्यपाल यांच्यासह केंद्रीय पदाधिकारी उपस्थित असतील. देशातील साधू महंत, कलाकार साहित्यिक यांना देखील शपथ समारंभात निमंत्रण दिले जाणार आहे.