शनिशिंगणापूर देवस्थानातील घोटाळ्याची चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत केलीय. तसंच शिर्डी आणि पंढरपूर प्रमाणे कायदा लागू करण्याचीही ग्वाही त्यांनी दिली. शनिशिंगणापूर तिर्थक्षेत्रात विश्वस्तांमार्फत मोठा भ्रष्टाचार झाला असून कर्मचारी भरतीतही गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला.
कुठलीही जाहीरात न देता कर्मचारी भरती झाली. धर्मादाय आयुक्तांनी चौकशी केली आणि निकाली काढली. पण, ती चौकशी झाली नाही. संस्थेचे स्पेशल ॲाडिट करावे लागेल. सचिव दर्जाच्या अधिका-याला नेमून सर्व तक्रारींची चौकशी करावी लागेल. शिर्डी आणि पंढरपूर प्रमाणे कायदा लागू करणार असल्याचेही ते म्हणाले.