“नाथाभाऊ आणि आमच्यात संवाद सुरु होता. आज सकाळी जयंत पाटलांचं ट्विट त्यांनी रिट्वीट केलं आणि मग डिलीट केलं तोपर्यंत आम्हाला आशा होती की ते सोडून जाणार नाही. त्या क्षणापर्यंत दोर तुटलेला नाही असं आम्हाला वाटत होतं. देवेंद्र फडणवीसांविरोधात त्यांचे जे काही आरोप असतील त्याबद्दल त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे आणि फडणवीसांनीही त्यावर स्पष्टीकरण दिलंय. परंतू या मुद्द्यावर आता चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही.