काँग्रेसच्या विनंतीला भाजपाचा मान, राज्यसभा निवडणूक होणार बिनविरोध

सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (15:23 IST)
राज्यसभेची पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.काँग्रेसच्या विनंतीला भाजपने मान दिला आहे.संजय उपाध्याय आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत.काँग्रेसचा नेत्या रजनी पाटील यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड होणार आहे.ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मागच्या आठवड्यात राज्यातील काँग्रेस नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
 
काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या रजनी पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. काँग्रसेच्या उमेदवार रजनी पाटील यांना बिनविरोध निवडून आणण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनी गुरुवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
 
काँग्रेसने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन लोटांगण घातल्यामुळे महाविकास आघाडीतील इतर नेते नाराज झाल्याची चर्चा होती. निवडणूक बिनविरोध करायची असेल,तर त्या बदल्यात १२ आमदारांचे निलंबन रद्द करण्याची देवेंद्र फडणवीसांनी मागणी केल्याची चर्चा होती.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती