ठाकरे सरकारच्या निर्णयाला भाजप, मनसेचा पाठिंबा

सोमवार, 5 एप्रिल 2021 (07:38 IST)
राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर शनिवार, रविवारचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी सात पर्यंत हे निर्बंध लागू राहणार आहेत. ठाकरे सरकारच्या निर्णयाला भाजप, मनसेने पाठिंबा दिला आहे.
 
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्य सरकारच्या या निर्णयाला आमचा पूर्णपणे पाठींबा आहे. राज्य सरकारच्या नियमांचे लोकांनी पालन करावे असे आम्ही आवाहन करतो‌. राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनाही मी आवाहन करतो की त्यांनी पाहिजे तिथे सहकार्य करावे, असेही ते म्हणाले. तसेच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने राज्यातील जनतेला नियमांचे पालन करावे असे आवाहन केले.
 
दरम्यान,  मंत्रिमंडळाची बैठक झाली. महाराष्ट्रात कडक निर्बंध तयार करण्यात आले आहेत.  राज्यात नाईट कर्फ्यू राहील. सगळे मॉल, रेस्टॉरंट, बार बंद राहतील. अत्यावश्यक सेवा चालू राहतील. सरकारी कार्यालय 50 टक्के क्षमतेनं, इंडस्ट्री पूर्णपणे चालू, कन्स्ट्रक्शन साईट चालू राहिल. राज्यातील गार्डन, चौपाट्या, धार्मिक स्थळं बंद राहतील. तसेच सर्व प्रकारच्या धार्मिक, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमही बंद राहणार आहेत. रेमडेसिव्हिरची नियमावली लागू होईल. गरज नसलेल्यांना देणार नाही. सरकारी हॉस्पिटल्सध्ये तुटवडा नाही.’

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती