अखेर भाजप-मनसेमध्ये युती, पालघर जिल्ह्यामध्ये एकत्र लढणार

सोमवार, 27 सप्टेंबर 2021 (21:59 IST)
भाजप- मनसे युतीचा श्री गणेशा पालघर जिल्ह्यामध्ये झाला आहे. पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी पालघरमध्ये पोटनिवडणुकीसाठी मनसे भाजप एकत्र आले असल्याची माहिती दिली आहे. पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी देखील भाजपशी युती करावी असा आग्रह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धरला आहे. मनसैनिकांच्या वाढत्या दबावामुळे अखेर भाजप-मनसेमध्ये युती झाली आहे. 
 
मनसेनं पालघर जिल्ह्यात पोटनिवडणूक लढवण्यासाठी भाजपशी युती केली आहे. पालघर जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होऊ घातली आहे. पालघरमधील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसेमध्ये युती झाली आहे. या युतीची माहिती मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली असून भाजप पालघर जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी अधिकृत घोषणा केली आहे. भाजपने हात पुढे केला तर मनसेही हात पुढे करेल आणि भाजपशी युती केल्यास मनसेला फायदा होईल असे वक्तव्य पुण्याते मनसे नेते वसंत मोरे यांनी केलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती