मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य यांच्याबाबत पोस्ट लिहिणाऱ्या महिलेला भाजपकडूनच मदत?

शुक्रवार, 7 ऑगस्ट 2020 (12:39 IST)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपूत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर एका महिलेनं आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. या प्रकरणी सुनयना होलेविरोधात सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. पण, या महिलेला जामीन हा भाजपच्या नेत्यांची केल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे. राज्यात भाजपला सत्तेवरुन खाली खेचल्यानंतर ठाकरे सरकाराला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचे नेते कोणतीही संधी सोडत नाही. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे.
 
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या फोटो हा मौलवी म्हणून व्हायरल करण्यात आला होता. या पोस्टमुळे तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अखेर या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर सुनयना होले या महिलेला अटक करण्यात आली होती. पण, या महिलेला काही दिवसांपूर्वीच जामीन मिळाला आहे. या जामिनामागे भाजपचा हात असल्याचं समोर आलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती