महापालिका निवडणुकीत भाजपाने योग्य खेळी करत आपल खात उघडल असून, एक नगरसेवक निवडणून आला आहे. हो हे घडल आहे पिंपरी-चिंचवड महापलिकेत. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने ताकद पणाला लावली आहे. मात्र दोन्ही पक्षांना भोसरीतील प्रभाग क्रमांक ६ मधून उमेदवार मिळाला नाही, त्यामुळे भाजपाने उर्वरित इतर अपक्ष उमेदवाराचीयोग्य पद्धतीने समजूत काढली त्यामुळे सर्वांनी अर्ज माघारी घेतले आहे. त्यामुळे उरला फक्त एकच उमेदवार तोही भाजपाचा त्यामुळे येथील भाजपचे उमेदवार रवी लांडगे यांची बिनविरोध निवड झाली आहे.रवी लांडगे हे भाजपचे नेते अंकुशराव लांडगे यांचे पुतणे आहेत. त्यामुळे भाजपने तरी सुरुवात चांगली केली आहे.