"वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना कोळसा आणि बँकेचे घेतलेले पैसे भरायचे आहेत. या पुढे वीज कोणालाही फुकट देणार नाही. वीज वापरायची असेल तर बिल भरावेच लागेल," असं महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय.
शेतकरी वीज बिलावरून भाजप आमदार हरिभाऊ बागडे, प्रशांत बंब यांनी ऊर्जामंत्री राऊत यांची भेट घेतली. भाजप आमदारांनी शेतकऱ्यांकडून थकीत बिल वसुली सक्तीने करू नये, वीज बिलात सूट द्यावी, अशी मागणी केली. यावर राऊत यांनी वीज बिल भरावेच लागेल, अशी भूमिका घेतली.