सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण: अन्य 2 फरार मुख्य आरोपींना अटक, पोलिसांना मोठे यश

शनिवार, 4 जानेवारी 2025 (11:05 IST)
Sarpanch Santosh Deshmukh murder case: संतोष देशमुख खून प्रकरणात आतापर्यंत वाल्मिक कराड याला पकडता आले. पण आता पोलिसांना आणखी एक यश मिळाले आहे. या प्रकरणातील अन्य दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, लवकरच ते सीआयडीकडे सोपवणार आहे. 
ALSO READ: पुण्यात कार्यक्रमात शरद पवार आणि छगन भुजबळ एका मंचावर दिसले
मिळालेल्या माहितीनुसार संतोष संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अन्य दोन मुख्य संशयितांना पोलिसांनी अटक केल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना मुख्य संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे.या प्रकरणातील मुख्य संशयित म्हणून सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना अटक करण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना सीआयडीकडे सोपवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपींना पकडण्यासाठी बीड पोलिसांनी विशेष शोध पथक तयार केले होते. ज्यांच्या मदतीने हे यश मिळाले. या विशेष पथकाने डॉ. संभाजी वायभसे यांच्या मदतीने गोपनीय माहिती मिळवून व तांत्रिक कौशल्याचा वापर करून आरोपी सुदर्शन चंद्रभान घुले आणि सुधीर ज्ञानोबा सांगळे यांना अटक केली. लवकरच त्यांना पुढील तपासासाठी गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात येणार आहे. हे दोन्ही आरोपी अनेक दिवसांपासून पोलिस आणि सीआयडीच्या रडारवर होते. अखेर या आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती