गणरायाचं आगमन होण्यासाठी काही दिवस बाकी आहेत.गणेश उत्सव साजरा करण्यासाठी सर्व गणेशभक्त अति उत्साहासाठी गणरायाच्या स्वागताच्या प्रतिक्षेत असतात. मात्र, कोरोनाच्या महामारीमुळे यंदा उत्सव साधेपणाने साजरा करण्यात यावा अशा सुचना राज्य सरकारकडुन देण्यात आल्या आहेत.या पार्श्वभुमीवर ठाकरे सरकारकडुन एक महत्वपुर्ण बैठक घेण्यात आली आहे.यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.
गणेशोत्सवाला आता अवघे 5 दिवस उरले आहेत. यंदाही गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा, पुणे एक्सप्रेस मार्गी कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी करण्यात आली आहे.याबाबत घोषणा मंत्री शिंदे यांनी केलीय. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी यंदाही मुंबई-गोवा, मुंबई-कोल्हापूर मार्गावर नियोजन असेल.खड्डे दुरुस्ती, पोलीस, वाहतूक पोलीस, अशा सर्व उपाययोजना करण्यासाठी आज बैठक झाली. कोकण मार्गावरील टोल सवलत, टोल स्टिकर देण्याचा निर्णय झाला. यासाठी नागरिकांनी आपल्या गाडीची माहिती दिल्यानंतर त्यांना स्टिकर दिले जाईल. गणेशोत्सवाच्या 2 दिवस आधी आणि विसर्जनाच्या 2 दिवसा नंतर पर्यंत ही सेवा असणार आहे.
दरम्यान, टोल नाक्यांवर वाहनांची रांग लागलेली असते.मुंबई-गोवा महामार्ग आणि एक्स्प्रेस वे ने कोल्हापुरमार्गे कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.तर,मुंबईतून कोकणात जाण्यास सुरुवात झालीय.या दिवसात कोकणात जाणाऱ्या खासगी,सरकारी बसेस, कोकण रेल्वे जादा असते. सहज तिकीट मिळत नाही.खासगी वाहनाने मुंबईकर मोठ्या संख्येने कोकणात गणपतीसाठी जातात. मात्र, यावर्षी या सगळ्यांना टोलमाफी (Toll wave) मिळणार आहे.