नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील महिला बालविकास प्रकल्प अंतर्गत होणार्या अंगणवाडी सेविका भरतीमधे मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाला असुन मनमाड नजीक असलेल्या दहेगाव येथील ग्रामसेवक सरपंच यांनी सोनवणे व चौधरी साहेब यांच्याशी संगनमत करून विवाहित असलेल्या महिलेला अविवाहित तसेच गावात रहिवासी नसतांना रहिवासी दाखला देऊन शासनाची फसवणूक केली तसेच आपत्र असलेल्या महिला उमेदवारास पात्र करून भरती केली असल्याचा आरोप विनिता गायकवाड या महिलेने केला असुन या भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाला आहे.
ग्रामसेवक, संबंधित अधिकार्यांकडून शासनाची फसवणूक
येथील महिलेचे लग्न होऊन तिला एक मुलगा आहे.तसेच ती तिच्या सासरी राहते तरीही केवळ आर्थिक लाभापोटी सदर महिलेला कुमारीचा अविवाहित दाखला तसेच गावाची रहिवासी नसतांना रहिवासी दाखला दिला आहे. ग्रामसेवक सरपंच तसेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी शासनाची फसवणूक केली असून याबाबत चौकशी व्हावी.
अंगणवाडी सेविका या पदासाठी महिला त्या गावची रहिवासी असावी अशी अट असतांना देखील गावात न राहणार्या महिलेला दाखला देत शासनाची फसवणूक केली आहे.या सबंध भरती प्रकियेची चौकशी करून दोषींवर कारवाई तसेच योग्य उमेदवाराना भरती करावे अशी मागणी असुन जर चौकशी करून दोषींवर कारवाई केली नाही तर पंचायत समितीच्या कार्यालयाबाहेर आमरण उपोषण करणार असून यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल.