मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पश्चिमच्या मुख्य डीपी रोडवर डी मार्टमध्ये तरुणी कामाला होती. तिला काही महत्त्वाच्या कामासाठी रजा हवी होती. तिने व्यवस्थापनाकडून रजा मागितली मात्र तिला रजा दिली नाही. त्यामुळे ती चिडली होती.
तरुणीने पुन्हा एकदा गुरुवारी रजेसाठी अर्ज केला. पण तिला रजा देण्यास नकार दिला
यावरून संतापून तिने रागाच्या भरात येऊन डी मार्ट मधल्या पहिल्या मजल्यावरील कपडे आणि खेळणी ठेवलेल्या भागात आग लावली. आग लावल्यामुळे डी मार्ट मध्ये गोंधळ उडाला. या वेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीमुळे 20 हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात स्टोअरच्या व्यवस्थापकाने भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपास करत आहे.