सकाळी नऊ ते दहा वाजताच्या सुमारास कामतघर येथील वऱ्हाळ तलावा शेजारील काटेकर क्रीडांगण येथे काही मुले खेळण्यासाठी गेले असता त्यापैकी काही मुले पाण्यात पोहण्यास उतरले असता आर्यनचा तोल गेल्याने तो पाण्यात बुडू लागला. त्याच्या सोबत असलेल्या मुलांनी आरडाओरड केल्या नंतर त्या ठिकाणी नागरीक धावून आले.पण आर्यन चा शोध लागला नाही त्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी दोन तासांच्या शोध मोहिमे नंतर आर्यनचा मृतदेह तलावातून बाहेर काढला.याबाबत शहर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.