टीव्हीच्या आवाजावरून भांडण, सुनेने कापली सासूची बोटं, नवऱ्याला चापट लावली

बुधवार, 7 सप्टेंबर 2022 (15:34 IST)
तसं तरसर्वच घरांमध्ये टीव्हीचा रिमोट किंवा आवाज यावरून लहान मुले किंवा वडीलधारी मंडळींमध्ये वाद किंवा भांडण होत असते. परंतु हे प्रकरण इतके गंभीर होऊ शकते की पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचू शकते असे कुणालाही कल्पना नसेल. असाच काहीसा प्रकार महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात घडला आहे जेथे एका सुनेने आपल्या सासूची तीन बोटे दाताने कापली.

अंबरनाथ शहरातील वडवली खांड परिसरातील एका सोसायटीत राहणाऱ्या कुलकर्णी कुटुंबाच्या घरात ही विचित्र घटना घडली.
 
अंबरनाथच्या गंगागिरी अपार्टमेंटमध्ये 32 वर्षीय विजया कुलकर्णी पती आणि सासूसोबत राहतात. 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 च्या सुमारास सासूबाई भजन म्हणत असताना त्यांची सून विजया टीव्ही पाहत होती. टिव्हीच्या आवाजात सासूबाईंना भजने गात असताना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी सुनेला टीव्हीचा आवाज कमी करण्यास सांगितले मात्र सुनेने फारसे लक्ष दिले नाही.
 
सासूने वारंवार अडवल्यानंतर विजया रागावली आणि टीव्ही जोरात सुरूच ठेवला. सून विजयाच्या या वागणुकीवर सासूने टीव्ही बंद केला. सासूने टीव्ही बंद केल्यावर सून अधिकच चिडली आणि दोघींमध्ये कडाक्याचे भांडण झाले. दोघांमध्ये शाब्दिक युद्ध झाले नंतर सून सासूला म्हणू लागली की हे माझे घर आहे, मी या घरात काहीही करेन. सासूही म्हणू लागली की हे माझ्या नवऱ्याचे घर आहे.
 
नंतर सुनेने सासूला शिवीगाळ केली. सासू-सुनेमध्ये भांडण सुरू असताना सूनेने रागाच्या भरात सासूच्या उजव्या हाताची तीन बोटे दाताने चावली. त्यानंतर महिलेच्या हातातून रक्त वाहू लागले.

पत्नी आणि आईचे भांडण पाहून मुलगा सौरभ मध्यस्थी करण्यासाठी आला. विजयाने पती सौरभला शिवीगाळ केली आणि त्यालाही मारहाण केली. यासोबतच विजयाने तिच्या पतीलाही धमकी दिली.

या घटनेनंतर सासूने अंबरनाथ पूर्व येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात जाऊन सुनेविरुद्ध गुन्हा दाखल केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती