भीमा कोरेगाव दंगलप्रकरण : रश्मी शुक्ला यांची चौकशी आयोगापुढे हजेरी

शुक्रवार, 19 नोव्हेंबर 2021 (08:41 IST)
भीमा कोरेगाव दंगलप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी चौकशी आयोगापुढे हजेरी लावली. मात्र, यासंदर्भात आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांची साक्ष नोंदविण्यात आली नाही. शिवाय सुनावणीची पुढील तारीखही निश्चित झाली नसल्याची माहिती सरकारी वकील शिषिर हिरे यांनी दिली.
 
सह्याद्री अतिथीगृहात शुक्ला यांची दोन दिवस आयोगापुढे साक्ष नोंदविण्यात येणार आहे. सन २०१८मध्ये दंगलीत झालेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकारने या प्रकरणी उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षतेखालील आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांचा चौकशी आयोग नेमला आहे.
 
या आयोगाकडून रश्मी शुक्ला यांची साक्ष नोंदवली जात आहे. शुक्ला  आयोगासमोर हजर झाल्या असल्या तरी शपथपत्र दाखल करण्यासाठी त्यांनी आयोगाकडे वेळ मागितला आहे. एल्गार परिषदच्या कार्यक्रमाबाबत पुणे पोलिसांकडून काही कागदपत्रे मिळणे बाकी असल्याचे त्यांनी आयोगापुढे सांगितले

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती