मुंबई : मुंबईला ऐतिहासिक वास्तूंचा समृद्ध वारसा लाभला आहे. त्यामुळे हे शहर आंतरराज्य, तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांना नेहमीच आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. अशातच आता मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेली डबल डेकर ओपन डेक बस पुढील महिन्यापासून म्हणजेच ऑक्टोबरपासून हद्दपार होणार आहे. बेस प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईत फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान ओपन डेक बसमधून होणारे 'मुंबई दर्शन' 5 ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. त्यानंतर ओपन डेक बस चालवण्याचा सध्यातरी कुठलाही विचार बेस्ट उपक्रमाचा नसल्याचा सांगण्यात आलं आहे. बेस प्रशासनाच्या या निर्णयामुळे मुंबईत फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना मोठा मानला जात आहे. सध्या सेवेत असलेल्या तिन्ही ओपन डेक बसचा आयुर्मान संपल्यामुळे या जुन्या बस आता हद्दपार होणार आहेत. 50 नवीन ओपन डेक बस खरेदीसाठी काढलेली निविदा रद्द केल्याने बेस्टच्या माध्यमातून केले जाणारे 'मुंबई दर्शन' ऑक्टोबरपासून बंद होणार आहे.
ओपन डेक बसमधून पर्यटकांचं 'मुंबई दर्शन'
ही ओपन डेक बस नॉन एसी आहे. यात अप्पर डेक आणि लोअर डेक असतात. अप्पर डेक आणि लोअर डेकचं भाडं वेगळं आहे. अप्पर डेक ओपन असल्याने यातून मुंबईची सफर करता येते. जेव्हा ही गाडी सुरु झाली तेव्हा मुंबईतील पश्चिम उपनगरातील पर्यटनस्थळांना भेट दिली जात असे. मात्र आता दक्षिण मुंबईमधील पर्यटन स्थळं या बसच्या माध्यमातून पाहता येत होत्या.
'या' ठिकाणांची सफर
मुंबईत येणाऱ्या पर्यटकांना ओपन डेक बसेसमधून प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम, मंत्रालय, विधानभवन, सीएसएमटी, बीएमसी, हुतात्मा चौक, हॉर्निमल सर्कल, आरबीआय, एशियाटिक लायब्ररी, जुनं कस्टम हाऊस, एनसीपीए, मरीन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, चर्चगेट स्थानक, ओव्हल मैदान, मुंबई हायकोर्ट आणि मुंबई विद्यापीठ या ठिकाणांची सफर घडवण्यात येत होती.