बापू बिरू वाटेगावकर यांचे निधन

मंगळवार, 16 जानेवारी 2018 (17:04 IST)

गोरगरीब जनतेसाठी रॉबिनहूड अशी प्रतिमा असलेले बापू बिरू वाटेगावकर (९०)  यांचं दीर्घ आजारानं निधन झाल आहे. इस्लामपूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

गोरगरीबांवर अन्याय करणारे खासगी सावकार आणि महिलांवर अत्याचार करणारे गुंड यांच्याविरोधात बापू बिरू वाटेगावकर यांनी आवाज उठवला. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव, रेठरे, हरणाक्ष, मसुचिवडी, ताकारी परिसरात एकेकाळी त्यांच्या नावानं थरकाप उडायचा. त्यांच्या जीवनावर बापू बिरू नावाचा चित्रपटही निघाला होता. 

जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतर बापू बिरूंनी आध्यात्मिक आणि सामाजिक प्रबोधनाचं काम सुरू केलं. गावोगावी त्यांना व्याख्यानासाठी बोलावलं जायचं. बोरगाव परिसरात महाराज या नावानं ते ओळखले जायचे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती