गुंड गजानन मारणेला १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर

गुरूवार, 18 फेब्रुवारी 2021 (09:34 IST)
पुण्यातील गुंड गजानन मारणे याने तळोजा कारागृह ते पुण्यापर्यंत जंगी मिरवणूक काढल्या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी त्याच्यासह नऊ जणांना अटक केली. त्यानंतर बुधवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता. प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.
 
गजानन मारणे हा तळोजा कारागृहापासून ३०० पेक्षा अधिक चारचाकी गाड्यांच्या ताफ्यासह पुण्यात दाखल झाला होता. या जंगी मिरवणुकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्याने या घटनेची एकच चर्चा सुरू झाली. अखेर या प्रकरणी कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गजानन मारणेसह नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या सर्वांना अटक करण्यात आली.
 
गजानन पंढरीनाथ मारणे, प्रदीप दत्तात्रय कंधारे, बापू श्रीमंत बागल, अनंता ज्ञानोबा कदम, गणेश नामदेव हुंडारे, रुपेश कृष्णराव मारणे, सुनील नामदेव बनसोडे, श्रीकांत संभाजी पवार आणि सचिन ताकवले यांना अटक करण्यात आली होती. तर मारणेसह त्याच्या २०० त्याच्या साथीदारांविरुद्ध कोथरुड गुन्हा दाखल करण्यात आला. त्यापैकी मारणेसह नऊ जणाना पोलिसांनी अटक केली व इतर गुन्हा दाखल झालेल्यांपैकी २७ जणांची नावे निष्पन्न झाली आहेत.
 
दरम्यान त्यांना पुणे जिल्हा सत्र न्यायालयातील आर. के. बाफना भळगट यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील संजय दीक्षित आणि बचाव पक्षाच्यावतीने विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. दोन्ही बाजू ऐकूण घेतल्यावर न्यायाधीशांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यावर बचाव पक्षांने जामीन मिळावा अशी बाजू मांडली. त्यानंतर अखेर त्या सर्वांना प्रत्येकी १५ हजारांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती