बडी जीत का बडा शोर होगा, तुम्हारा सिर्फ…’नवाब मलिक यांच्या कार्यालयातून एक ट्विट

गुरूवार, 3 मार्च 2022 (21:24 IST)
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जामीन नाकारला असून त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. नवाब मलिकांना ३ मार्चपर्यंत सुनावण्यात आलेल्या ईडी (ED) कोठडीत आता ७ मार्चपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याचपार्श्वभूमीवर नवाब मलिक यांच्या कार्यालयातून एक ट्विट करण्यात आले आहे.
 
नवाब मलिकांची  ईडीकडून  पुन्हा एकदा कोठडी मागण्यात आली होती. त्यानंतर यावर युक्तीवाद झाला. हा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर विशेष पीएमएलए कोर्टाने ७ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी दिली आहे.याचदरम्यान नवाब मलिक यांच्या कार्यालयातून  ‘बडी जीत का बडा शोर होगा, तुम्हारा सिर्फ वक्त है, हमारा दौर होगा, असे ट्विट करण्यात आले आहे.
 
बड़ी जीत का बड़ा शोर होगा तुम्हारा सिर्फ वक़्त है, हमारा दौर होगा!!
 
— Office of Nawab Malik (@OfficeofNM) March 3, 2022
 
नवाब मलिकांनी ५५ लाख हसीन पारकरला दिल्याचे ईडीने म्हटले आहे. ईडीने न्यायालयात त्यांची चूक कबूल केली असून मलिकांनी ५ लाख दिल्याचे म्हटले आहे. आमच्या टायपिंगंमध्ये चूक झाल्याचं ईडीने म्हटल्याचं एएसजी अनिल सिंह यांनी सांगितलं. मात्र, २५ ते २८ फेब्रुवारी अशा चार दिवसांच्या कालावधीसाठी मलिक वैद्यकीय कारणास्तव रुग्णालयात होते. त्यामुळे मलिकांची कोठडी वाढवून द्यावी, असा युक्तीवाद सिंह यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती