विशेष वांड:मय पुरस्कार 'लोक माझे सांगाती' ला

मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने मा. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मराठीतील उत्कृष्ट ग्रंथांना दिला जाणारा विशेष वांड:मय पुरस्कार आज मा. शरद पवार यांचे राजकीय आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाला जाहीर झाला. 
 
ज्येष्ठ साहित्य समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते हा पुरस्कार औरंगाबाद येथे यशवंतराव चव्हाण सभागृहात मराठवाड्यातील ख्यातनाम साहित्यिकांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ख्यातनाम साहित्यिक डाॅ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने शरद पवार यांच्या पुस्तकाची या सन्मानासाठी निवड केली. 
 
या समितीत मनोहर जाधव हे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख व मराठीचे प्राध्यापक प्रभाकर देसाई हे होते. याच सोबत आयुष्यभर रंगभूमीची सेवा करणाऱ्या रंगकर्मींसाठी लोटू पाटील यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार यंदा डाॅ. जब्बार पटेल यांना देण्यात आला.

वेबदुनिया वर वाचा