काय आहे प्रकरण?
भाजप जिल्हा सचिव अशोक दामले यांनी 29 ऑगस्ट रोजी सकाळी साडे सात वाजता भाडेकरू महिला अश्लील वर्तणूक करते, असा आरोप करत त्यांनी व त्याच्या पत्नीने सदर महिलेला मारहाण केली. या प्रकरणात दामले आणि त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही तक्रार दाखल झाल्याची माहिती मिळताच दामलेसह या भागातील 28 नागरिकांनी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेणारा अर्ज त्याच दिवशी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पोलिस ठाण्यात दिला. दामले यांनी काही व्हिडिओ, छायाचित्र व्हायल केल्याचा मुद्दा उपस्थित करत शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकार्यांनी दामले यांच्या विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
3 सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता तक्ररदार भाडेकरू महिलेने बदनामी झाल्याने फिनेल प्राशन केले. त्यानंतर दामलेच्या पत्नीनेही सकाळी 10 वाजता विष प्राशन केले. या दोघीं महिलांवर घाटी रुग्णालय आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तक्ररदार भाडेकरू महिलेने बदनामी झाल्यामुळे तर दामलेच्या पत्नीला पतीला खोट्या गुन्ह्यात अडकवत असल्याचा प्रकार सहन न झाल्याने आत्महत्या केल्याचे कारण सांगितले.