मिळालेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाला एक धमकीचा ईमेल आला आहे. हा मेल चेन्नईहून आला आहे, जिथे खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. एवढेच नाही तर या धमकीनंतर नागपूर खंडपीठालाही धमकीचा मेल आला आहे. नागपूर खंडपीठाला 'मद्रास टायगर'च्या नावाने बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली.तसेच सुरक्षेसाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दुपारी १२ वाजताच्या सुमारास औरंगाबाद खंडपीठात धमकीचा मेल आला. त्यानंतर उच्च न्यायालय परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच, न्यायालयाच्या सर्व दरवाज्यांसमोर सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. हा ईमेल कोणी पाठवला याचा शोध घेण्यासाठी पोलिस पुढील तपास करत आहे.
नागपूर खंडपीठाचीही अशीच अवस्था आहे, ज्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात आहे. ही धमकी मिळाल्यानंतर उच्च न्यायालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. संपूर्ण न्यायालयाच्या परिसरात तपासणी सुरू आहे आणि कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. तसेच, पोलिसांनी तातडीने कारवाई केल्याने परिस्थिती नियंत्रणात आली.