त्यावेळी भाजपला 'आणीबाणी' आठवली नाही, रोहित पवार यांचा टोला

गुरूवार, 5 नोव्हेंबर 2020 (08:19 IST)
भाजपलाच आता 'आणीबाणी'ची आठवण झाली आहे, याचे आश्चर्य वाटते. यांचे सरकार होते. त्यावेळी सरकारविरोधात लिहिले, त्यांना अटक केली. तेव्हा गळचेपी झालेली नाही. भाजप सरकारविरोधी लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केले गेले. त्यावेळी भाजपला 'आणीबाणी' आठवली नाही, असा जोरदार टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे. 
 
सरकारविरोधात लिहिले, बोलले म्हणून  द वायर, एनडीटीव्ही, द प्रिंट यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देताना भाजप नेत्यांना 'आणीबाणी' आठवत नाही.पण पत्रकारितेच्या नावाखाली विशिष्ट अजेंडा रेटणाऱ्या 'अभिनेत्यावर' कारवाई होताच त्यांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आठवते आहे, असा थेट सवाल भाजपला रोहित पवार यांनी विचारला आहे.
 
रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी ही कारावाई म्हणजे 'आणीबाणी' आणि पत्रकारितेविरोधात आहे, असे म्हटले होते. याला रोहित पवार यांनी ट्विट करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती