नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी शर्मिष्ठा वालावलकर यांची नियुक्ती

गुरूवार, 24 नोव्हेंबर 2022 (08:45 IST)
नाशिक : नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी शर्मिष्ठा वालावलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज (दि. २३) शर्मिष्ठा वालावलकर यांनी त्यांचा पदाचा पदभार स्वीकारला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांना दुजाभाव देत नाही असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले आहे.
 
माजी एसीबी अधीक्षक सुनील कडासणी यांची बादली झाली असून त्यांच्या जागी शर्मिष्ठा वालावलकर यांनी पदभार स्वीकारला आहे. तर नाशिकला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक पदी पहिली महिला वरिष्ठ अधिकारी म्हणून त्यांच्या या नियुक्तीकडे पहिले जाते आहे.
 
भ्रष्टाचाराला आळा बसावा यासाठी कुठेही शासकीय अधिकारी भ्रष्टाचाराला खतपाणी घालत असल्यास तातडीने एंटी करप्शन विभागाशी संपर्क साधण्याचे आव्हान शर्मिष्ठा वालावलकर यांनी नागरिकांना केले आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती