ईडीच्या चौकशीतून जी काही गोष्ट आहे, ती बाहेर येणार : सोमय्या

बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (15:34 IST)
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे कारस्थान जनतेसमोर येत आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की, अशी व्यक्ती मंत्रीमंडळात राहू शकते का ? या गोष्टीचा तपास करावा. नवाब मलिक हे गेल्या अनेक दिवसांपासून गप्प आहेत. त्यांनाही ईडीच्या कारवाईची कुणकुण लागली होती. ईडीच्या चौकशीतून जी काही गोष्ट आहे, ती बाहेर येणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
 
जे काही आहे चौकशीतून बाहेर येणार, असेही नवाब मलिकांवर बोलताना सोमय्या म्हणाले. त्यांचे कारस्थान बाहेर आले, तर अशी व्यक्ती मंत्रीमंडळात राहणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावे. अशा प्रकरणात उद्धव ठाकरे एक शब्द का बोलत नाहीत ? असाही सवाल किरीट सोमय्यांनी यावेळी केला. संजय राऊतांचा पार्टनर सुजित पाटकरच्या कोविड हॉस्पिटलला अजित पवारांनी ब्लॅकलिस्ट केले, त्याबद्दल मुख्यमंत्री का बोलत नाहीत ? असाही सवाल किरीट सोमय्यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती