देशासमोर मोठे संकट असून निवडून आलेल्या लोकांपेक्षा निवडलेल्या लोकांकडून राज्यकारभार चालवण्याचा प्रकार घडत असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या अरविंद केजरीवाल यांनी कालच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर आज शरद पवार यांची भेट घेऊन भाजप आणत असलेल्या आध्यादेशाविरोधात पाठिंब्यासाठी विनंती केली.
यावेऴी माध्यमांसमोर बोलताना शरद पवार म्हणाले, “देशासमोर मोठे संकट उभा राहीले असून देशातील लोकशाही धोक्यात आहे. हे संकट फक्त दिल्लीसमोर नसून संपुर्ण देशात अशाप्रकारची परिस्थिती आहे. लोकशाहीने निवडून आलेल्या लोकांना डावलून निवडलेल्या लोकांकडून देश चालवला जात आहे. हा लोकशाहीवरिल आघात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला पाठींबा देणार आहे.”
पुढे बोलताना ते म्हणाले, “माझा विचार असा आहे की, भाजप विरोधी लोकांना ताकद देणे हि काळाची गरज आहे. केंद्रिय़ स्तरावर कोणाला प्रोजेक्ट करायचे हा गौण मुद्दा आहे. पण भाजपविरोधी मुद्यावर बोलणी सुरु राहीली पाहीजे.” असे बोलून त्यांनी आपला पाठींबा व्यक्त केला.