नरभक्षक बिबट्याचा हल्ला सहावा बळी

मंगळवार, 28 नोव्हेंबर 2017 (16:21 IST)

जळगाव येथील चाळीसगाव तालुक्यात पाच जणांचा लागोपाठ बळी बिबट्याने घेतला आहे. आज मंगळवारी पहाटेत्याने पुन्हा हल्ला करत  सहावा बळी घेतला. बिबट्याला ठार मारण्याचे आदेश राज्याच्या वनमंत्र्यांनी दिले आहेत. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे खुर्द येथे झोपडीत झोपलेल्या वृद्धेवर बिबट्याने हल्ला केला, यामुळे  बिबट्याच्या हल्यातील मयतांची संख्या सहावर पोहोचली आहे. मात्र वन प्रशासन सुस्त दिसत असून फिरण्या पलीकडे कोणतेही काम ते करताना दिसत नाहीत. 

या हल्ल्यात यमुनाबाई तिरमली (७०) महिला ठार झाली.  मंगळवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना समोर  आली.  वनविभागा वर ग्रामस्थ संतापले आहेत. यमुनाबाई तिरमली यांच्या झोपडीवजा घरात कुटुंबातील तीन मुलांसह झोपल्या होत्या. त्याचवेळी नरभक्षक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. घटनास्थळापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर तिरमली यांची मान आढळली तर धडाचा शोध घेण्याचे काम सुरू होते. राहुल चव्हाण (८), अलका अहिरे (५०), बाळू सोनवणे (२५), दीपाली नारायण जगताप (२५), सुसाबाई धना नाईक (५५)  या सर्वांवर बिबट्याने हल्ला करत ठार केले आहे. या परिसरात नागरिक फार भयभीत झाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती