मुक्त विद्यापीठातील गैर कारभारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची विनोद तावडे यांच्याकडे मागणी

शनिवार, 2 सप्टेंबर 2017 (09:01 IST)

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रमामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाच्या बी.एस्सी अभ्यासक्रमाची पुस्तके तयार न करताच लाखो रुपयांचा अपहार व गैर कारभार केल्याचे समोर आले असून या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ.जयवंतराव जाधव यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आ.जयवंतराव जाधव यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे कीयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान अभ्यासक्रमामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाच्या बी.एस्सी अभ्यासक्रमाची पुस्तके तयार न करताच लाखो रुपयांचा अपहार केला आहे. कोर्ससाठी तयार करण्यात आलेल्या व्हीडीओ लेक्चर्स मध्येही घोटाळा करण्यात आलेला आहे. कोर्स तयार करण्यासाठी तत्कालीन संचालकाकडून माजी संचालकाच्या मुलीचीच नेमणूक करण्यात आली आहे. विद्यमान संचालकांच्या पतीनेही लेक्चर्स तयार केलेले आहे. या अभ्यासक्रमांचा लागणारा  सर्व खर्च अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे दाखवत आधीच अदा केलेला  आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती